Pune

निगडी पोलिसांच्या अभ्यागत कक्षाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

By PCB Author

August 20, 2021

पुणे, दि.२० (पीसीबी) : पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्षाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हे अनावरण केले. पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, तसेच इतर कामानिमित्त येणारे नागरिक आणि पोलीस यांना त्यांचे काम होईपर्यंत थांबण्यासाठी बैठकीची व्यवस्था व्हावी, यासाठी अभ्यागत कक्ष उभारण्यात आलाय

या अभ्यागत कक्षामध्ये नागरिकांना बैठकीची व्यवस्था, पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती, स्लाईड शोद्वारे दाखवण्याची व्यवस्था आहे. अभ्यागत कक्षामध्ये नागरिकांना त्यांचे काम होईपर्यंत वाचण्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.