निगडी, दिघीतून दोन दुचाकी, वाकड मधून दोन कार चोरीला

0
166

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – निगडी आणि दिघी परिसरातून वाहन चोरट्यांनी दोन दुचाकी तर वाकड परिसरातून दोन कार चोरून नेल्या. तसेच एमआयडीसी भोसरीमधून इको गाडीचा सायलेन्सर चोरीला गेला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 15) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सचिन मोरेश्वर शिरुडे (वय 33, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चिंचवड येथील दवा बाजार येथून चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी 11 ते रात्री साडेआठ या कालावधीत घडली.

संकेत भाऊसाहेब व्यवहारे (वय 21, रा. डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 12 ते 14 जानेवारी या कालावधीत घडली.

प्रवीण पांडुरंग भालचीम (वय 33, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची दीड लाख रुपये किंमतीची कार आणि शाम तुकाराम गोडांबे यांची दोन लाख रुपये किंमतीची कार चोरट्यांनी चोरून नेली. या घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. 15) सकाळी सव्वासहा या कालावधीत रहाटणी येथे घडल्या.

सायलेन्सरचा मधला भाग चोरीला

एमआयडीसी भोसरी येथे पार्क केलेल्या एका इको गाडीच्या सायलेन्सर मधील 50 हजार रुपये किमतीचा कॅथलॅटीक कन्व्हर्टर (जो प्लॅटिनम ग्रुप ऑफ मेटल्सने बनवलेला असतो) चोरून नेला. ही 12 ते 14 जानेवारी या कालावधीत घडली. प्रतीक कन्नुभाई सोलंकी (वय 25, रा. उद्योगनगर, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उघड्या दरवाजावाटे मोबाईलची चोरी

उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातून 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना रामदास नगर, चिखली गावठाण येथे गुरुवारी (दि. 13) सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनिल ज्ञानेश्वर कोडभरे (वय 46, रा. रामदासनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.