निगडी ओटास्कीम येथे नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

0
536

निगडी, दि. २१ (पीसीबी) – नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत माजवणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यातील दोघांना दोन तलवारीसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी सोमवारी (दि.२०) रात्री पावणेआठच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनी बिल्डींग क्र.६ च्या जवळ केली.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी निखील साहेबराव साठे (वय २५, रा. घर क्र.४, पत्राशेड चिकन चौक, दळवीनगर, निगडी) आणि राजेश रामु लष्करे (वय २०, रा. गणेश प्रोव्हीजन स्टोअर्स शेजारी राजनगर ओटास्कीम निगडी) या दोघांना अटक केली असून लखन कैलास सातव आणि शिवा कसबे हे दोघे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनी बिल्डींग क्र.६ च्या जवळ काही तरुण हातात तलवारी घेऊन परिसरात गोंधळ घातल असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत निखील आणि राजेश या दोघांना ५०० रुपये किमतीच्या दोन तलवारींसहीत अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार लखन आणि शिवा हे फरार आहेत. निगडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.