Bhosari

निगडी ओटास्किम येथील घरातून चार पिस्तुल आणि आठ काडतुसे जप्त; आरोपीस अटक

By PCB Author

August 26, 2018

निगडी, दि. २६ (पीसीबी) – निगडीतील ओटास्किम येथील एका राहत्या घरातून विक्रिसाठी आणलेले चार देशी बनावटीचे पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे असा एकुण १ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी शनिवारी (दि.२५) सकाळी पावनेदहाच्या सुमारास केली.

याप्रकरणी अनुप नवनाथ सोनवणे (वय २८, रा. ओटास्किम, निगडी) या तरुणाला अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याकडून निगडी पोलिसांना आरोपी अनुप सोनवणे याने त्यांच्या ओटास्किम येथील घरात विक्रिसाठी चार देशी बनावटीचे पिस्तुल आणल्या असून त्या लपवून ठेवल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर निगडी पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी पावनेदहाच्या सुमारास अनुप सोनवणेच्या घरात धाड टाकली. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तेथे चार देशी बनावटीचे पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे असा १ लाख १९ हजारांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आणि अनुप याला अटक केली. तसेच त्यांच्यावर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,५,२५ अनवये बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.