निगडी ओटास्किम परिसरात पोलिसांच्या अभयाने सर्रासपणे मटका व्यवसाय; स्थानिक नागरिकांनीच केले स्टिंग ऑपरेशन

0
1351

निगडी, दि. ११ (पीसीबी) – निगडी ओटास्किम परिसरात पोलिसांच्या अभयाने सर्रासपणे मटका, जुगार, गावठी दारु विक्री सुरु आहे. यामुळे परिसरात वारंवार मारहाणीच्या घटना आणि सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी निगडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

नागरिकांनी अवैधधंद्यांना विरोध देखील केला मात्र काही गुंडांनी त्यांना धमकावले असल्याचे त्यांनी आयुक्त पद्मनाभन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. काही स्थानिक नागरिकांनी याचे स्टिंग देखील केले असून त्यांनी याचे पुरावे देखील आयुक्तांना दिले आहेत. आता यावर आयुक्त काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.