निगडी उड्डाणुलावरुन उडी मारुन तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; सतर्क पोलिस आणि नागरिकांमुळे वाचले प्राण

0
1611

निगडी, दि. १४ (पीसीबी) – घरघुती भांडणाला कंटाळून एका तरुणाने निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी नऊच्या सुमारास समोर आली. सुदैवाने काही वाहन चालकांनी आणि वाहतुक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरुन एक तरुण उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. हे लकशात येताच काही वाहन चालकांनी आणि वाहतुक पोलिसांनी तातडीने त्या तरुणाकडे धाव घेत त्याला आडवले. तरुणाची विचारपुस केली असता त्याने घरघुती वादाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. वाहतुक पोलिसांनी याबाबत तातकाळ निगडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.