निगडीमध्ये दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन तरुणाच्या गालावर ब्लेडने वार

0
1302

भोसरी दि ६ (पीसीबी) – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन जणांनी मिळून दुचाकीवरुन घरी निघालेल्या दोघांना शिवीगाळ करत हाताने जबर मारहाण करुन त्यातील एकाच्या गालावर ब्लेडने वार केले. ही घटना शनिवारी (दि.३) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील संजय हॉटेलसमोर घडली.

रविंद्र जयभिम नाटेकर (वय २१, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, सेक्टर २२ निगडी) आणि गणेश उद्यकर असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार राहुल आणि योगेश साळवी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रविंद्र आणि त्याचा मित्र गणेश हे दोघेही त्याच्या दुचाकीवरुन मिलींदनगर येथील घरी निले होते ते संजय हॉटेलच्या समोरपोहचले असता आरोपी राहुल आणि योगेश या दोघांनी रविंद्र आणि गणेश या दोघांना आडवले आणि दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. रविंद्र आणि गणेश यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपी राहुल आणि योगेश या दोघांनी मिळून रविंद्र आणि गणेश याला शिवीगाळ करत हाताने जबरमारहाण केली. त्यानंतर राहुल याने त्यांच्या जवळील ब्लेडने रविंद्र यांच्या गालावर वार करुन गंभीर जखमी केले आणि पसार झाला. आरोपींविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत.