Bhosari

निगडीत सेल्समनचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून

By PCB Author

October 05, 2018

निगडी, दि. ५ (पीसीबी) – निगडी अजंठानगर येथील एका पान टपरीजवळ उभा असेल्या सेल्समनचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली.

नंदू चव्हाण (वय ३९, रा. सांगवी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू हा सेल्समनचे काम करतो. आज दुपारी तो अजंठानगर येथील एका पानाच्या टपरीजवळ थांबला होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला आणि पसार झाले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेत आहेत.