निगडीत मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणावर दगडाने हल्ला

0
451

निगडी, दि. २१ (पीसीबी) – घरासमोर मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने दगडाने हल्ला केला. या घटनेत तरुणाच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना  रविवारी (दि.१९) रात्री एकच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील चिकन चौक येथे घडली.

राहुल जितेंद्र कसबे (वय १९, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी बिल्डींग क्र. एफ २, रुम नं ४०१, चिकन चौक, ओटास्किम निगडी) असे दगडाने मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी राहुल हा त्याचा मित्र गौरव सरोदेसोबत त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून गप्पा मारत होते. यावेळी अंधाराचा फायद घेत अज्ञात हल्लेखोरांनी राहुल याच्यावर दगडाने हल्ला केला. यामध्ये राहुल याच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. निगडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.