Bhosari

निगडीत महिलेच्या घरावर दगडफेक; एका कुटूंबातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By PCB Author

October 02, 2018

निगडी, दि. २ (पीसीबी) – मुलासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एकाच कुटूंबातील तब्बल दहा जणांनी मिळून एका महिलेच्या घरावर जबरदस्त दगडफेक केली. या घटनेत महिला जखमी झाली असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री साडेदहाच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील मिलिंदनगरमध्ये घडली.

याप्रकरणी जखमी कांताबाई यलाप्पा सोनकांबळे (वय ४५, रा. मिलिंदनगर सेक्टर  नं. २२, घर नं.३/२१, ओटास्किम, सोमेश्वर मंदिरासमोर निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार एकाच कुटूंबातील कस्तुरबाई गुरुनाथ भोसले, संग्राम गुरुनाथ भोसले, बाबू भोसले, उमा बाबू भोसले, गौतम गुरुनाथ भोसले, सुनंदा गौतम भोसले, जयभिम गुरुनाथ भोसले, रेखा जयभिम भोसले, नागम्मा बाई आणि विकी लष्करे या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी कांताबाई यांचा मुलगा राहुल आणि आरोपी संग्राम भोसले या दोघांचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात भोसले कुटूंबातील दहा जणांनी कांताबाई यांच्या मिलिंदनगर येथील घरावर जबरदस्त दगडफेक केली. या घटनेमध्ये कांताबाई याच्या डोक्याला दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच परिसरात उभे असलेला ट्रक (क्र.एमएच/१२/आरए/८८५२) आणि दुचाकी (क्र.एमएच/१४/जीआर/२८०९) या दोन गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी भोसले परिवारातील दहाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करत आहेत.