निगडीत पादचारी महिलेची २ लाखाची सोन्याच्या दागिन्याची पर्स दुचाकीस्वाराने लांबवली

772

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन टोळक्यांनी सुमारे १ लाख ७७ हजार ५०० किंमतीची सोन्याची दागिने असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. हा प्रकार गुरूवारी (दि. २०) सायंकाळी चारच्या सुमारास निगडीतील गोकुळ स्वीट येथे घडला.

या प्रकरणी नंदा बबन साबळे (वय ४९, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू खेमु राठोडगे (वय ३४) आणि शंकर उर्फ शिवा रामदास बिराजदार (वय ३४) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा या गुरूवारी (दि. २०) सायंकाळी चारच्या सुमारास निगडीतील गोकुळ स्विट येथून घराच्या दिशेने पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या राजू आणि शंकर या दोघांनी नंदा यांच्या हातात असलेल्या सुमारे १ लाख ७७ हजार ५०० किंमतीची सोन्याचे दागिने असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी दोघांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.