Bhosari

निगडीत पती-पत्नीस मारहाण करुन परिसरातील सात वाहनांची तोडफोड

By PCB Author

September 20, 2018

भोसरी, दि. २० (पीसीबी) – पती-पत्नीस बांबू आणि दगडाने जबर मारहाण करुन सात जणांच्या टोळक्यांनी परिसरातील तब्बल सात वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि.१८) रात्री साडेअकराच्या सुमारास मिलींदनगर कदम गिरणी शेजारी, सेक्टर नं.२२, निगडी येथे घडली.

याप्रकरणी संतोष यशवंत गायकवाड (वय ४०) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अक्षय गायकवाड (वय २२, रा. ओटास्किम निगडी), आंबादास सुर्यवंशी (वय २३) आणि रवी कुऱ्हाडे, राहुल महानोर (सर्व रा. सेक्टर नं.२२, बौध्दनगर, निगडी) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी संतोष हे त्यांच्या मिलिंदनगर येथील घरासमोर झोपले होते आणि त्यांची पत्नी दारात बसली होती. यावेळी वरील सात टोळके तेथे आले त्यांनी फिर्यादी संतोष आणि त्यांच्या पत्नीला शंकर कुठे आहे अशी विचारणा करुन शिवीगाळ करत बांबू, दगड आणि लोखंडाच्या पट्टीने जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बौध्दनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांची तोडफोड करुन पसार झाले. निगडी पोलिस तपास करत आहेत.