Bhosari

निगडीत दारुड्याने शेजाऱ्याची दुचाकी पेटवली

By PCB Author

March 19, 2019

निगडी, दि. १९ (पीसीबी) – दारूच्या नशेत एकाने शेजाऱ्याच्या घरासमोरील दुचाकीच पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी कौसर युनिस शेख (वय 32, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पिंट्या शितोळे (वय ३८, रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण) या दारुड्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तक्रारदार कौसर यांनी त्यांची टिव्हीएस स्टार सिटी (क्र.एमएच/१४/डीसी/४९२७) ही दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. यावेळी आरोपी पिंट्या हा दारू पिऊन आला. त्याने कौसर यांच्या दुचाकीवर कापड झाकले आणि आग लावली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. दुचाकी जाळण्याचा कौसर यांनी पिंट्याला जाब विचारला असता पिंट्याने कौसर यांना शिवीगाळ करत धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिंट्याला अटक केली आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.