Chinchwad

निगडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

March 11, 2019

निगडी, दि. ११ (पीसीबी) – राहत्या घरातील छताच्या हुकला साडीच्या सहाय्याने एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथे घडली.

संदीप दिगंबर पवार (वय ३१, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास संदीप याने विठ्ठलवाडी आकुर्डी येथील त्याच्या राहत्या घरात छताच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषीत केले. संदीपने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.