निगडीत ज्ञानप्रबोधिनीच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
543

पिंपरी,  दि. २३ (पीसीबी) – निगडीतील ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण पुणे चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेचे ४९ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर ७५ ते ८९ टक्के गुण मिळवून ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे विद्यार्थी अथर्व उमाशेखर कुलकर्णी याला ९९.८० टक्के, साक्षी विठोबा महाजन ९७.४० टक्के, श्रेया संदीप जगताप हिला ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत. तर श्रावणी कौस्तुभ कुलकर्णी, सोनिया जगदाळे, श्रृती पिंगळे यांनी गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. तर अथर्व कुलकर्णी, साक्षी महाजन, प्रथमेश भोजने, ओम महाजन, यांनी संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. तंत्रशिक्षण विभागात अमृता प्रवीण साळुंखे ही प्रथम आली आहे.

यावेळी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्या प्रज्ञा पाटील, पर्यवेक्षक सुभाष गदादे, इंग्रजी विभाग प्रमुख मधुरा लुंकड आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्या पाटील, निकालाचे विश्लेषण बाळासाहेब वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, वैशाली गायकवाड यांनी केले. अनिरूध्द पुरीगोसावी, पटवर्धन नागेश जोशी, राजश्री मराठे यांनी संयोजन केले. तर देवळेकर यांनी आभार मानले