Pimpri

निगडीत उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून ट्रक उलटला

By PCB Author

January 14, 2019

निगडी, दि. १४ (पीसीबी) – भरधाव ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने ट्रक उलटला आहे. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास झाला.

(केए/३२/सी/६३८१) असे अपघात झालेल्या माल वाहतुक ट्रकचा क्रमांक आहे. त्याचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेसातच्या सुमारास (केए/३२/सी/ ६३८१) या क्रमांकाचा माल वाहक ट्रक पुण्याहून निगडीच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरून जात असताना उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेत पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक उलटून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन पडला. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. सोमवार असल्याने प्रचंड मोठ्या संख्येत वाहतुक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.