निगडीतील ‘लायन्स क्लब ऑफ पूना’च्या वतीने स्नेहवन संस्थेला १३० किलो धान्य भेट

0
581

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) –  ‘एक मूठ अनाज’ या संकल्पनेतून जमा केलेले गहू, तांदूळ, साखर असे १३० किलो धान्य, १००  बिस्कीट पुडे निगडीतील लायन्स क्लब ऑफ पूनाच्या सभासदांनी भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील स्नेहवन संस्थेस भेट दिले. 

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे, अशोक येवले, जयंत व जयश्री मांडे,   चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, अजित देशपांडे, अविनाश चाळके, मारुती मुसमाडे आदी उपस्थित होते.
आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी स्नेहवनची उभारणी केली. देशमाने यांनी  मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. येथील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वडील, आई व पत्नी अर्चना यांनी देशमाने यांच्या  कार्यात सर्वस्वीपणे वाहून घेतले आहे. याबाबत लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या सर्व सदस्यांनी देशमाने कुटूंबाचे तोंड भरून कौतूक केले.

निगडी लायन्स क्लब ऑफ पूनाचे अध्यक्ष जनार्दन गावडे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जोपासत अशोक देशमाने स्नेहवनच्या माध्यमातून खरी सामजसेवा करत नवी पिढी घडवत आहेत. स्नेहवनला यापुढील काळातही सर्वेतोपरी मदत करण्याचे  आश्वासन गावडे यांनी यावेळी दिले.