Bhosari

निगडीतील राजनगरमध्ये सोसाट्याच्या पावसामुळे रिक्षावर कोसळले झाड

By PCB Author

June 13, 2019

निगडी, दि. १३ (पीसीबी) – सोसाट्याच्या वादळी पावसामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षावर अचानक झाड कोसळल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहाणी झालेली नाही. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळच्या सुमारास निगडीतील राजनगरमध्ये घडली.

अचानक घडलेल्या घटनेमुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच काही भाग देखील चेंबला आहे.