निगडीतील भक्ती-शक्ती चौकात मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या चौघांना अटक

0
3113

निगडी, दि. १८ (पीसीबी) – मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या चौघाजणांना निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी शनिवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास केली.

सैफ रौफ शेख (वय २३, रा. जुना मुंढवारोड, गणेशनगर वडगाव शेरी, पुणे), प्रमोद सुनिल पाटील (वय २१, रा. स.नं.२९/३, बोऱ्हाडे वस्ती सक्सेस होम अपार्टमेंट, खराडी), दिनेश विजय नायर (वय २७, रा. टिंगरेनगर लेन नं.१३, अक्षय अपार्टमेंट फ्लॅठ नं.३०३, तीसरा मजला, खराडी) आणि अमर रामदास उदलमले (वय ३१, रा. शेंदाळे चाळ दापोडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजय वसंतराव शिंदे (वय ५१, रा. चर्तुभुज निवास, स.नं.१५४/अ विश्रांतवाडी, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी निगडी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, निगडीतील भक्ती-शक्ती चौकात चारजण मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानुसार निगडी पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या ठिकाणी सापळा रचून सैफ, प्रमोद, दिनेश आणि अमर या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एक मांडूळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी त्या बॅगेसह साप जप्त करुन आरोपींना अटक केली. त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.