निगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न

0
821

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – पुर्ववैमनस्यातून चौघांनी घरामध्ये पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याच प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २२) मध्यरात्री एकच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे घडला. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

युवराज बाबुराव शेलार (वय ५०), राहूल युवराज शेलार (वय २७), बिभीषण बाबुराव शेलार (वय ५५), किरण बिभीषण शेलार (वय ३०, सर्वजण, रा. दत्तनगर, चिंचवड) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकनाथ बबन कुसाळकर (वय ५०, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या वरील चौघांसोबत फिर्यादी एकनाथ यांचे भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून कुसाळकर सोमवारी (दि. २२) मध्यरात्री आपल्या मुलासोबत झोपलेले असताना चौघांनी कुसाळकरांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पेट्रोल टाकून आग लावलेल्या घराचा आगीत अर्धा दरवाजा जळून खाक झाला आहे. आगीचा भडका पाहून कुसाळकरांना वेळीच जाग आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या प्रकरणी चौघा आरोपी विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.