Desh

निकृष्ट जेवणाची तक्रार करणाऱ्या व्हायरल जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

By PCB Author

January 18, 2019

रेवाडी, दि. १८ (पीसीबी) – निकृष्ट जेवणाची तक्रार करणारा व्हायरल बीएसएफ जवान तेज बहादुर यादवचा मुलगा रोहित यादव (वय २२) याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला.

तेज बहादुर विरोधात शिस्तभंगाची कारवाई करून नोकरीवरून काढण्यात आले. त्याच जवानाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा मुलगा रोहित घरात एकटाच होता. तसेच घटनास्थळावरून एक परवाना असलेली पिस्तुल सुद्धा सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आत्महत्येचा अंदाज लावला असून पुढील तपास सुरू आहेत.