ना सेनेचा ना भाजपचा मुख्यमंत्री आमचाच – धनंजय मुंडे

0
369

मुंबई, दि, २३ (पीसीबी) – मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात आघाडीचाचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर चौफेर टीका केली यावेळी बोलताना ‘विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘भाजपच्या कालच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. हे विस्मरण कसे झाले?शिवाजी महाराज स्मारकाची अजून एक वीटही रचली गेली नाही. आता शिवशाही सरकार आणू म्हणतात. पण भाजपने त्यांचा अपमान केला आहे,’ असे म्हणत शिवस्मारकावरून धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मुंडे यांनी गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उध्दवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळे समजू नका अशा आशयाच ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.