…नाहीतर कपडे संभाळत पळताभुई थोडी होईल – नारायण राणे

0
242

मुंबई,दि.२६(पीसीबी) – “आमच्याकडे नजर फिरवु नका, नाही तर कपडे संभाळत पळताभुई थोडी होईल” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. कालच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपूत्रांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बेडूक अशी संभावना करुन राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याच टीकेला नारायण राणे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

“इतकीवर्ष साहेबांकडून पाहून गप्प बसलो. पण राणे कुटुंब, भाजपावर आगपाखड केली, तर ३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिलं, अनुभवल तरे सारं बाहेर येईल असा इशाराच राणेंनी दिला. निवडणुकीच्याआधी हिंदुत्व मुख्यमंत्री बनताना सेक्युलर हे गांडूळसारख झालं” असंही राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान “बेडूक एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मराठीचे शब्द आम्ही काढले तर भारी पडेल, तू मुख्यमंत्री झाला मराठी माणसासाठी काय केले?” असा सवाल राणेंनी विचारला.