नासाच्या मंगळ मोहिमेला प्रारंभ

0
574

अमेरिका,दि.३१(पीसीबी) – नासाच्या मंगळ मोहिमेला गुरुवारी (30 जुलै) सुरुवात झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी नासाच्या पर्सिवरन्स आणि इंजिन्युईटी हेलिकॉप्टरला घेऊन अॅटलास रॉकेटनं उड्डाण केलं. या रॉकेटनं अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून केप कॅनव्हराल एअर फोर्स स्टेशनवरून हे उड्डाण केलं. जवळपास 48 कोटी किलोमीटरचा प्रवास करून 18 फेब्रुवारी 2021ला पर्सिविअरन्स रोव्हर मंगळावर उतरेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एकाच महिन्यात चीन, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि आता अमेरिकेनं मंगळावर यान पाठवलं आहे.

याच महिन्यात प्रथम चीनचं तियानवेन-1 आणि नंतर युएईचं होप हे यान मंगळाकडे झेपावलं आहे. मंगळावरची जीवसृष्टी, तिथल्या वातावरणाचा आणि मातीचा अभ्यास या मंगळ मोहिमांकडून केला जाणार आहे.
अमेरिकेच्या यानामधली विशेष गोष्ट म्हणजे पर्सिविअरन्स हे 1 टनाचं रोव्हर मंगळावर उतरणार आहे. या रोव्हरसोबतच एक अत्यंत छोटेखानी हेलिकॉप्टरही असेल. या हेलिकॉप्टरचं नाव इंजिन्युईटी आहे. रोव्हर मंगळावर स्थिरावल्यानंतर त्यातून हे इंजिन्युईटी हेलिकॉप्टर बाहेर येईल आणि मंगळाच्या आकाशात पहिल्यांदा उड्डाण करेल. यावेळी रोव्हर आपल्या कॅमेऱ्यामार्फत या हेलिकॉप्टरचे फोटो घेणार आहे. स्रोत,NASA/JPL-CALTECH मंगळाच्या वातावरणात हवेत चालणारं यंत्र उडू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर वजा उडणारं यंत्र पाठवलं गेलं आहे. याचं वजन अवघं 1.8 किलो इतकं आहे. याला दोन गोलाकार फिरू शकणारे पंखे आहेत.

पर्सिविअरन्स रोव्हर मंगळावरच्या जेझेरो क्रेटरवर म्हणजेच मंगळावरच्या 40 किलोमीटरचा परिघ असलेल्या मोठ्या गोलाकर खड्ड्यावर उतरेल. यापूर्वी या क्रेटरचे उपग्रहांमार्फत नासाने फोटो घेतले होते. त्यावरून या क्रेटरमध्ये काही वर्षांपूर्वी सरोवर असल्याची शंका आहे.

मंगळावर असलेली जीवसृष्टी शोधणं हे या रोव्हरचं मुख्य काम आहे. मंगळावर जीवाणू आहेत का? याचा सुद्धा शोध घेतला जाईल. मुळात म्हणजे हे रोव्हर पुन्हा पृथ्वीकडे परतणार आहे. त्यानंतर रोव्हरकडून आलेल्या नमुन्यांची सविस्तर चाचणी केली जाईल. स्रोत,NASA/JPL-ALTECH नासामधले संशोधक आणि या रोव्हर असलेल्या कॅमेऱ्यांच्या उपकरणांचे प्रमुख संयोजक जिम बेल सांगतात की, “या रोव्हरवर अत्याधुनिक असे 23 कॅमेरे बसवण्यता आले आहेत. तसंच, या रोव्हर प्रथमच मायक्रोफोन म्हणजे माईक बसवण्यात आला आहे. जेणेकरून जेव्हा हे रोव्हर आपलं खोदकाम मंगळाच्या भूमीवर सुरू करेल तेव्हा येणारे आवाज आम्हाला ऐकता येतील आणि त्याचा अभ्यास करता येईल.”

या रोव्हरसोबत एक मानवाला वापरता येऊ शकेल असा स्पेससुटही पाठवण्यात आला आहे. ज्याच्यावर मंगळाच्या वातावरणाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास त्यामुळे करता येईल.

रोव्हरवर एक मॉक्सी नावाचं उपकरण बसवण्यात आलं आहे. हे उपकरण मंगळाच्या वातावरणात असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचं ऑक्सीजनमध्ये रुपांतर करण्याचं काम करेलं.Sया सगळ्या अभ्यासाचा भविष्यातल्या मंगळावरच्या मानवी मोहिमांसाठी उपयोग होईल. असं नासाच्या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.