नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलँट स्पर्धेत पिंपरी–चिंचवड मधील विद्यार्थ्यांचे यश

0
469

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनच्या वतीने दि.७ ते १० फेब्रुवारी रोजी तीन दिवसीय ऑल इंडिया झोनल पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप २०१९- २० या राष्ट्रिय स्पर्धांचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे केले होते.

पिंपरी – चिंचवड मधील राष्ट्रीय पिंच्याक सिलँट स्पर्धेत जयेश माळी ने २ रौप्यपदक, मनीषा माळी ने २ रौप्यपदक, मानस कुंभार ने १ कांस्यपदक,रुद्रान्श कुंभार ने कांस्यपदक तर जयेश्वरी वाडेकर ने कांस्यपदक पटकावले आहे.

महाराष्ट्र- ४७ सुवर्ण २४ रौप्य ३६ कांस्य 

यामध्ये महाराष्ट्र संघाने ४७ सुवर्ण २४ रौप्य व ३६ कांस्य अशी एकूण १०७ पदके पटकावून सलग सातव्यांदा प्रथम क्रमांकाचा चषक पटकाविला . तसेच जम्मु काश्मीर या संघाने १८ सुवर्ण , १३ रौप्य १७ कांस्य अशी एकूण ४८ पदके पटकावून  दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकाविला. उत्तर प्रदेश संघाने देखील १३ सुवर्ण, ४ रौप्य ९ कांस्य अशी एकूण २६ पदके पटकावून तिसऱ्या क्रमांकाचा चषक पटकाविला.

या स्पर्धांचे उद्घाटन समारंभ मा. नामदार  छगन भुजबळ  (पालक मंत्री नाशिक)  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ३१ राज्यांमधून ७०० खेळाडू सहभागी झाले होते. या प्रसंगी इंडियन  पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष  किशोर येवले सर यांनी पिंच्याक सिल्याट  खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंनी एशियन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप, बीच गेम्स, वर्ल्ड पिंच्याक सिल्याट स्पर्धांमध्ये जिंकलेल्या खेळाडूंची व पदकांची माहिती क्रीडा मंत्र्यांना दिली तसेच या खेळाच्या खेळाडूंना स्कॉलरशिप,  सरकारी नोकरीत आरक्षण तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ करून द्यावा अशी विनंती मागणी किशोर येवले यांनी केली. या प्रसंगी इंडियन  पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष श्री किशोर येवले सर यांनी पिंच्याक सिल्याट  खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंनी एशियन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप, बीच गेम्स, वर्ल्ड पिंच्याक सिल्याट स्पर्धांमध्ये जिंकलेल्या खेळाडूंची व पदकांची माहिती क्रीडा मंत्र्यांना दिली.

या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ. महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री आदिती ताई तटकरे, (पालक मंत्री – रायगड जिल्हा) यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आले.

यावेळी माननीय क्रीडा मंत्र्यांनी पिंच्याक सिल्याट या खेळाला महाराष्ट्र शासनाच्या सर्व मान्यता देण्याचे तसेच या खेळाच्या खेळाडूंना इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच पिंच्याक सिल्याट खेळाची स्वसंरक्षणासाठी उपयुक्तता लक्षात घेता आणि महाराष्ट्र भर  आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी या खेळाचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे सूचित केले तसेच या खेळाच्या विविध स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात भरवण्यात याव्यात अशी सूचना क्रीडा मंत्र्यांनी दिली आणि विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेची सांगता भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशन चे अध्यक्ष  किशोर येवले सर यांच्या भाषणाने झाली. विविध राज्यातील खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले आणि सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच ऑल पिंपरी चिंचवड पिंच्याक सिलँट असोसिएशन चे विध्यार्थ्यांनि यश संपादन करत पिंपरी चिंचवड चे नाव उंचविले आहे.

यावेळी ऑल पिंपरी चिंचवड पिंच्याक सिलँट असोसिएशन चे अध्यक्ष जयेश माळी, मनीषा माळी (सचिव), किशोर सैंदाणे (खजिनदार), सुभाषचंद्र कोठारी(असोसिएशनचे पदधिकारी), याकुब शेख (मानवाधिकार संरक्षण संघटना), लक्ष्मण दवणे‌ (अध्यक्ष पुणे शहर मानवाधिकार संरक्षणसंघटना), जनसंपर्क अधिकारी पुणे जिल्हा. आदी उपस्थित होते.