Bhosari

नाशिक फाटा येथे घातक कोयत्यासह तरुणाला अटक

By PCB Author

May 09, 2019

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – घातक कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला कोयत्यासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि.८) दुपारी सव्वा एकच्या सुमारास नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर केली.

विकास ओमप्रकाश चव्हाण (वय १९, रा. नारायण सोसायटी,मोरेवस्ती, चिखली) असे कोयत्यासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर भारतिय हत्यार कायद्यान्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.