Pimpri

नाशिक फाटा बीआरटीएस मार्गामध्ये पीएमपीबसने दुचाकीस्वाराला चिरडले

By PCB Author

May 26, 2019

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – नाशिक फाटा कासारवाडी जवळील कल्पतरु चौकात एका पीएमपी बसने दुचाकीस्वाराला चिरडले. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी असल्याचे समजते.

गुरुदीप सिंह (वय ३९) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.