Maharashtra

नाशिकमध्ये शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचे राजीनामा

By PCB Author

October 15, 2019

नाशिक, दि. १५ (पीसीबी) – ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमधील शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. या सर्वांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजपला सोडल्याने नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून नाराजी व्यक्त केली होती.  

भाजपने सीमा हिरे यांना उमेदवारी  दिल्यानंतर विलास शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने ही जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी  केली होती. शिवसेनचे  २२ नगरसेवक या मतदारसंघात  असल्याने शिवसेनेने  उमेदवारीचा दावा केला होता. परंतु,येथे सीमा हिरे या विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. यामुळे शिवसेनेचे इच्छुक, कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा हिरमोड झाला होता.  त्यामुळे या नाराजीतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी  राजीनामा दिला आहे.

संतोष गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, प्रविण तिदमे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, हर्षा बडगुजर, कल्पना पांडे, हर्षदा गायकर, किरण गामने, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, राधा बेंडकुळे, रत्नमाला राणे, सीमा निगळ आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.