नाशिकमध्ये धारदार हत्याराने वार करुन तरुणाचा खून

0
704

नाशिक, दि. २३ (पीसीबी) – धारदार हत्याराने वार करुन एका तरुणाचा काही टोळक्यांनी नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास खून केला.

मनिष रेवर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रकाली परिसरात राहणाऱ्या मनिष रेवर या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मनिषवर गुरुवारी रात्री काही टोळक्यांनी हल्ला केला. त्यांनी मनिषवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.