नालासोपाऱ्यात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या; इस्त्रीचे चटके, शॉक दिल्याचा संशय

0
509

नालासोपारा, दि. ९ (पीसीबी) – नालासोपाऱ्यात भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या १०१ नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रुपाली चव्हाण (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महत्त्वाचे म्हणजे त्यांची दोन दिवसापूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस तपास करत आहेत.