नालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात परप्रांतीयांची घुसखोरी

0
785

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी नालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात चक्क परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये बंदची हाक देण्यात आली. या बंदचे पडसाद नालासोपारा येथेही उमटले. मात्र, या आंदोलनात परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचे समोर आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. नालासोपारा उड्डाण पुलावर आज (बुधवार) दुपारी आंदोलन सुरू होते. जोराजोरात घोषणा सुरू होत्या. जमावातील दोन तरुण पोलिसांचे ऐकत नव्हते. त्यांचा जोश कायम होता. मात्र, त्या दोन तरुणांच्या भाषेवरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना हटकले असता यातील एकाने त्याचे नाव ‘चौहान’ असे सांगितले. तर दुसऱ्याने ‘पवन पांडे’ असे नाव सांगितले. शेवटी पोलिसांनी त्या दोघांनाही बाहेर काढले.