नालासोपारा स्फोटके प्रकरण : जालण्यातून झेरॉक्स व्यावसायीकाला अटक; कॉम्प्युटर आणि हार्ड डिस्क जप्त

0
525

जालना, दि. १२ (पीसीबी) – नालासोपारा स्फोटके प्रकरणी दहशतवादी विरोधी पथक (एटीएसने) आज (बुधवार) सकाळी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

गणेश कपाळे असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील शनिमंदिर परिसरात गणेश कपाळे याचे झेरॉक्स आणि डीटीपी सेंटर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने गणेश कपाळेच्या दुकानातील कॉम्प्युटर आणि हार्ड डिस्क जप्त केल्या असून त्याला चौकशीसाठी औरंगाबादला नेले आहे. तेथे एटीएस कार्यालयात त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. नारासोपारा स्फोटके प्रकरणी एटीएसने जालन्यात केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी जालना नगरपरिषदेचा शिवसेना नगरसेवक असलेल्या श्रीकांत पांगारकर आणि भाजपचा माजी नगरसेवक व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला खुशालसिंग राणा ठाकूर याला ताब्यात घेतले होते.