Notifications

नालायक, बेशरम ‘टीक टॉक’ अकाऊंटवर मुलींना फॉलो करताना शमीला लाज कशी वाटत नाही

By PCB Author

June 28, 2019

मुंबई, दि, २८ (पीसीबी) – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने अवघ्या क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातून शामीवर कौतुकाचा वर्षाव होत असताना पत्नी हसीन जहाने मात्र त्याच्यावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. हसनीने शमीच्या टिक टॉकवरुन त्याच्यावर निशाणा साधला आहे.

मोहम्मद शमी त्याच्या टीक टॉक अकाऊंटवरुन केवळ ९७ जणांना फॉलो करतो. त्यातील ९० टीक टॉक अकाऊंट हे फक्त मुलींचे असल्याचा हसीन जहाने म्हटले आहे. त्याशिवाय याबाबतचा स्क्रिनशॉटही तिने तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे. बदमाश शामी अहमदने टिक टॉक अकाऊंट उघडले आहे. ज्यात त्याने ९७ लोकांना फॉलो केले असून त्यातील ९० तर फक्त मुलीच आहेत. एका मुलीचा बाप असून या नालायक, बेशरम माणसाला लाज वाटत नाही…शी..शी अशी कॅप्शनही हसीन जहाने दिली आहे.