नारायण राणे यांच्या फार्म हाऊसवर कारवाई; २१ गुंठे जमीन घेतली ताब्यात

0
312

रायगड, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांच्या फार्म हाऊसवर आज (सोमवारी) कारवाई करण्यात आली. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने कारवाई करत जागा ताब्यात घेतली. भूसंपादन मोबदला घेऊनही जागा ताब्यात न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.