नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार – बाळासाहेब थोरात   

0
2026

अहमदनगर , दि. २० (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये रमत नाही.  त्यांना आजही चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता  आहे, असे सूचक विधान काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात   यांनी केले आहे.  तसेच काँग्रेस सोडून गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर  आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

अहमदनगरमधील  नेवासात काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम करून  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. तसेच ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार झाले. नुकतेच भाजपने त्यांचा जाहीरनामा समितीत समावेश केला आहे.    राणे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेत त्यांनी विविध पदे भूषविले होती. ते युती सरकारच्या वेळी मुख्यमंत्रीही होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेही त्यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध मंत्री पदे सांभाळली आहेत.