Maharashtra

नारायण राणेंनी प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी इतका मोठा पक्ष आहे का? – नितेश राणे  

By PCB Author

December 08, 2018

कोल्हापूर, दि. ८ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इतका मोठा पक्ष आहे का?  असा सवाल करून राष्ट्रवादीतील अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आज (शनिवार) येथे केला आहे.     

राणे सांगलीला जाताना त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी  ते पत्रकारांशी  बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजून इतका मोठा पक्ष नाही की, ज्यात नारायण राणे जाऊन निवडणूक लढवतील. उलट २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक  नेते आमच्याबरोबर येतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.

भाजप सरकारने दिलेला मराठा आरक्षणाचा अहवाल हा एनजीओनी केला आहे. तर राणे समितीचा अहवाल हा जिल्हाधिकारी यांनी दिला होता. याच अहवालातील वरची आणि खालची पाने बदलली आहेत. हा सर्व अहवाल हा राणे समितीचा आहे. मात्र, राणे समितीला याचे क्रेडिट हे सरकार देत नसल्याची टीका त्यांनी केली.