नाभिक महामंडळाच्या वतीने माऊली महाराज वाळुंजकरांचा पुरस्कार देऊन सन्मान

0
922

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प.पू सदगुरू माऊली महाराज वाळुंजकर यांना हवेली तालुका समाज भूषण पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव होते. यावेळी दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवलेल्या संस्कृती संजय तावरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी नरेगावचे उपसरपंच अरूण ढमाले, कांताराम आढाव, प्रभाकर भालेकर, भिष्माजी गायकवाड, भाऊसाहेब यादव, तानाजी वाळुंजकर, पंकज व्यवहारे, राहुल शिंदे, शुभम मंडलिक, सागर कदम आदींनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष अशोक मगर यांनी स्वागत केले. अंकिता मगर, प्राजक्ता मगर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनिता मगर यांनी मानले.