नाना पाटेकर यांनी फेटाळले तनुश्रीचे आरोप

0
487

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेले आरोप अभिनेते नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहेत. या आरोपांबाबत पाटेकर यांनी महिला आयोगाला उत्तर लिहिले आहे.

सध्या हे प्रकरण पोलिसांत दाखल आहे. ही कायदेशीर लढाई असून आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे पाटेकर यांनी म्हटले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी नाना पाटेकर यांच्याकडून आयोगाला पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्यातील मजकूराविषयी त्यांनी भाष्य केले नाही. नाना पाटेकर यांचे वकील अॅड. अनिकेत निकम यांनी सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.