नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटीमध्ये बोलावले होते…प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खुलासा

0
359

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. #MeToo या सोशल मीडियावरच्या चळवळीबाबत तनुश्री दत्ताला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तर नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. अशात आता ज्या दिवशी या गाण्याचे शुटिंग सुरु होते त्यादिवशी नेमके काय घडले हे सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी सांगितले आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला दुपारी १२ च्या दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावले होते असा खुलासा बोर्डे यांनी केला आहे.