नाना पाटेकरकडून कोणतीही नोटीस आलेली नाही – तनुश्री दत्ता

0
359

मुंबई, दि. २ (पीसीबी) – अभिनेता नाना पाटेकरकडून आपल्याला कोणतीही नोटीस आलेली नाही, अशी माहिती अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिली आहे. कायदेशीर नोटीस देण्याच्या धमक्या याआधीही देण्यात आल्या आहेत. माझ्यासारखा चुकीचा अनुभव कोणालाही येऊ नये यासाठी या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र मी घाबरणार नाही. मात्र मी आज माझ्यासारखा अनुभव घेतलेल्या सगळ्यांना हे आवाहन करते की कोणालाही घाबरू नका, सत्य समाजासमोर आणा समाज तुम्हाला नक्कीच पाठिंबा देईल, असेही तिने माध्यमाशी बोलताना सांगितले.