Notifications

नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

By PCB Author

March 14, 2019

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – लोकसभेसाठी काँग्रेसने बुधवारी (दि. १३) रात्री महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर मतदारसंघात नाना पटोले, गडचिरोली- चिमूर मतदारसंघात डॉ. नामदेव उसेंडी, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात प्रिया दत्त, दक्षिण मुंबई मतदारसंघात मिलिंद देवरा आणि सोलापूर (राखीव) मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधून राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांच्याशी लढत देतील. तसेच अंतर्गत गटबाजीमुळे नाराज प्रिया दत्त व देवरा यांचाही राहुल गांधी यांनी पहिल्या यादीत समावेश केला आहे.