नाना पटोलेच्या पुतण्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

0
344

नागपूर, दि.१९ (पीसीबी) – साकोली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आणि राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या अंधारात पैस वाटताना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या दोघा पुतण्यांनी रंगेहाथ पकडले. यातील आरोपी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांना लाठ्याकाठ्यांनी बदडून काढल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली विधानसभा मतदार संघात सध्या निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. या मतदार संघात निवडणुकीतील उमेदवार आपल्या विजयासाठी नाना क्लृप्त्या आजमावत आहेत. काल शुक्रवारी तिर्थराज विनोद पटोले (वय ३२) या नाना पटोले यांच्या पुतण्याने पोलिसात दिलेल्या तक्रारी प्रमाणे, नाना पटोले यांचे दोन पुतणे तिर्थराज आणि जितेंद्र आपले प्रचार कार्य आटोपून रात्री पावणे दहाच्या सुमारास आपल्या सुकळी या गावी जाण्यास निघाले. दरम्यान, ते दोघे लाखांदूर फाट्या नजीक पोचताच समोर एक पांढऱ्या रंगाची कार (एम.एच ३१ सीए ४०७७) आणि काही इसम उभे असल्याचे दिसतात तिर्थराज यांनी एका इसमाकडून माहिती घेतली असता भाजपचे कार्यकर्ते पाकिटातून पैसे वाटत असल्याचे निदर्शनात आले. मात्र राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या अंधारात पैस वाटताना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या दोघा पुतण्यांनी रंगेहाथ पकडले. दोघा भावांना नाना पटोलेचे पुतणे असल्याचे म्हणत लाठ्याकाठ्या आणि तलवारीने हल्ला करून जखमी केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. स्टेशनसमोर मोबाईल वर बोलत असलेल्या नानाभाऊंच्या एका पुतण्याला भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ओढत नेऊन जबर मारहाण केली. मात्र वेळीच पोलिस आल्याने डॉ., फुके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ पळ काढल्याची तक्रार साकोली पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या १७१ (ब)(१). १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२४ कलमाखाली गुन्ह्याची नोंद केली आहे. यातील एका इसमाला त्या दोघा भावांनी रोख रकमेसह आपल्या गाडीत बसून आपल्या कार्यालयाकडे गेले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठले, पोलिसांनी त्या इसमाकडील लाल रंगाच्या ११० पाकिटातून १० लाख ५० हजार आणि २१७ पांढऱ्या पाकिटातून ७ लाख २४ हजार ६०० रुपये जप्त केले. पुढील तपास पोलिस करत आहे.