Chinchwad

नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने १२ ते १३ हजार गणेशमूर्तीचे संकलन  

By PCB Author

September 25, 2018

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – पवना नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी  नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. यामध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेशमूर्ती दान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील घरगुती व सार्वजनिक मिऴून सुमारे १२  ते १३ हजार श्रीं’च्या मूर्ती दान करण्यात आल्या.

मागील दोन वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन  नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मागीलवर्षी या उपक्रमात साडेतीन हजाराहून गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. या मूर्ती श्री फाउडेशन, पुणे यांना देण्यात आल्या. त्या मुर्त्यांची नव्याने रंगरंगोटी करून विक्री करण्यात आली. त्यामधून ३ ते ४ लाख रुपये निधी गोळा झाला. या निधीचा वापर अनाथ आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच यावर्षीही १२ ते १३ हजार मूर्ती या उपक्रमातून जमा करण्यात आल्या आहे. यामधून मिळणाऱ्या निधीचा विन्योग गरजू व अनाथ मुलांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करण्यात येणार आहे.