नाना आणि अमित शहांच्या भेटीचे कारण वेगळच…

0
428

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले होते. मात्र ही भेट राजकीय नसून अन्य काही कारणासाठी घेतली होती अशी माहिती नाना पाटेकर यांनी दिली आहे.

नाना पाटेकर यांनी सोमवारी अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गेले होते. जवळपास २० मिनिटे नाना आणि शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर नाना पाटेकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र नाना यांनी यावर स्पष्टीकरण दिले, अमित शहांची घेतलेली भेट ही सांगली, कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांसाठी होती. संस्थेला परदेशातून येणारा निधी स्वीकारण्यासाठी एफसीआरए सर्टिफिकेट मिळणे आवश्यक असते. त्याची परवानगी मागण्यासाठी आपण शाह यांना भेटल्याचे नानांनी सांगितले.