नानांच्या अडचणीत वाढ; तनुश्रीची आता राज्य महिला आयोगाकडेही तक्रार

0
436

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणात आता नाना पाटेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. तनुश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राज्य महिला आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये तनुश्रीने २००८ मध्ये घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्‍तर माहिती दिली आहे. या तक्रारीमध्ये तनुश्रीने २००८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये फेरफार व बदल करून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. माझ्या माहितीप्रमाणे ती तक्रार मराठीमध्ये दाखल करून घेतल्याने त्यावेळी माझ्या वडिलांना विश्वासात न घेता ही तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली. वडिलांना मराठी भाषा येत नसल्याने पोलिसांकडून चुकीची तक्रार लिहिण्यात आली आहे, असे तनुश्रीचे म्हणने आहे. यामुळे महिला आयोग आता या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.