Maharashtra

नातलगही राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत; पवार कुटुंबियांची चिंता वाढणार   

By PCB Author

August 26, 2019

उस्मानाबाद, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज (सोमवार) उस्मानाबादमधील  भूम-परांडा येथे दाखल झाली.  मात्र, शिवस्वराज्य यात्रेकडे पद्मसिंह पाटील यांच्यासह  पुत्र आमदार  राणा जगजितसिंह यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पाटील पिता-पुत्र राष्ट्रवादीला  रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवारांचे सख्खे मेहुणे पद्मसिंह पाटील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याने पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असताना आता नातलगही पक्षातून जात असल्याने पवार कुटुंबियांची चिंता वाढणार आहे.

दरम्यान, भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश व्हावा, यासाठी राणा जगजीत सिंह  आग्रही आहेत. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उस्मानाबादेत पोहोचणार आहे. त्यावेळी पाटील पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.