नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, केदार जाधव, कुलदीप यादवला वगळले

0
2366

मुंबई, दि, २ (पीसीबी) – भारत व बांगलादेश दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करेल मात्र त्यामुळे बांगलादेश स्पर्धेबाहेर जाईल. उलट बांगलादेश आज विजयी झाला तर भारतासाठी श्रीलंकेविरोधातला सामना करो वा मरो अशा स्वरूपाचा असेल तर बांगलादेशाचे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे दरवाजे उघडे राहतील.

इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्यामुळे भारतीय संघासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपचे साखळी स्पर्धेतील शेवटचे काही सामने शिल्लक असून ऑस्ट्रेलिया वगळता कुठल्याही संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नाहीये. त्यामुळे भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान व बांगलादेश या पाचही संघांचं व त्यांच्या चाहत्यांचं आजच्यासह पुढील सामन्यांवर लक्ष असणार आहे.