नाणेकरवाडीतून दोन वर्षांचा चिमुकला शनिवार सायंकाळपासून बेपत्ता; अपहरण झाल्याचा संशय

0
402

चाकण, दि. २३ (पीसीबी) – नाणेकरवाडी येथून दोन वर्षांचा चिमुकला शनिवारी सायंकाळी सहापासून बेपत्ता झाला.

चिकू मिथुन राठोड (वय २ वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) असे बेपत्ता मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला असून सोशल माध्यमांवर संबंधित मुलाची छायाचित्रे या भागात पाठविली आहेत. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.