नाणार प्रकल्पाच्या विरोधावर चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री फडणवीस

0
585

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची गोष्ट आहे. काही जणांचा या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. मात्र, हा विरोधावर चर्चेतून मार्ग काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.  

सर्वात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणल्याबद्दल मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होणार आहेत. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र, तो विरोध चर्चेतून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

दरम्यान, नाणार प्रकल्प हा मान सन्मानाचा मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, शेतकरी वर्गातून मी आलो आहे. जमीन अधिग्रहित करण्याचे दुःख मलाही माहिती आहे. मी खुल्या मनाने चर्चा करू इच्छितो. त्यावर मी सविस्तर ही बोलणार आहे, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.