नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश  

0
1367

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘सैराट’  चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे  यांच्यासह अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले.  

या कलाकारांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका, असे मनसेच्या चित्रपट सेनेने म्हटले आहे. आमचे काम बघून त्यांनी संघटनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.

गेले काही दिवस ही प्रक्रिया सुरू होती आणि आता त्यांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अनेक लोकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मनसेची चित्रपट सेना काम करत असल्याचे बघून या तिघांनी या संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.